बँक कर्मचार्‍यांना नोटबंदी ओव्हरटाईम मिळणार


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक जाहीर झालेल्या नोटबंदी नंतर जे अधिक वेळ काम करावे लागले त्याचा ओव्हरटाईम देण्याचा निर्णय घेतला असून कांही बँकांनी ओव्हरटाईमचे वाटप सूरू केल्याचेही समजते. नोटबंदी नंतर बँक कर्मचार्‍यांना ३७ दिवस जादा वेळ काम करावे लागले होते. त्यावर नॅशनल ऑरगनायझेशन ऑफ बँक वर्कर्स असो. ने कर्मचार्‍यांना या जादा वेळ कामाचा मोबदला मिळावा अशी मागणी लेबर कमिशनर यांच्याकडे केली होती. असोसिएशनचे महासचिव अश्विनी राणा म्हणाले आमची ही मागणी मान्य केली गेली आहे व बॅकांनी ओव्हरटाईमचे पैसे द्यावेत असे आदेश दिले गेले आहेत.

त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्र, बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, ओरिएंटल बँक अशा अनेक बँकांनी ओव्हरटाईमचे पैसे कर्मचार्‍यांना देण्याची सुरवात केली आहे तर स्टेट बँकेकडूनही त्याची तयारी सुरू झाली आहे. नोटबंदी नंतर लोकांनी जुन्या ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा बँकातून जमा केल्याने १५ लाख कोटींची रककम जमा झाली आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांना जादा वेळ काम करावे लागले होते.

Leave a Comment