हा सिक्रेट कोड देईल तुम्हाला बँक खाते आणि आधार लिंकिंगची माहिती


मुंबई : केंद्र सरकारने आधार कार्ड पॅनकार्डप्रमाणेच मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यासोबत लिंक करावे असा आदेश दिला आहे. बँक खात्याशी आधार क्रमांक ३१ डिसेंबरपर्यंत लिंक न झाल्यास तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही, त्यामुळे सरकारकडून वेळेत आधारकार्ड लिंक करा असे आवाहन दिली आहे. पण तुमचे आधारकार्ड लिंक झाले आहे की नाही ? हे तुम्हाला नेमके समजणार कसे ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आता हे अवघ्या एका क्लिकवर मिळणार असून ही सुविधा १ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

एका खास सिक्रेट कोड आधार कार्ड तुमच्या बॅंक खात्याशी लिंक झाले की नाही ? याची माहिती देण्यासाठी बनवण्यात आला आहे. हा कोड तुमच्या फोनमध्ये डाएल केल्यास तुमच्या मोबाईल स्क्रिनवर सारी माहिती दिसेल. या कोडला पाहणे अगदी सोप्प आहे. *99*99# कोड तुमच्या मोबाईलवरून डायल करा. ( ही सुविधा तुम्ही आधारकार्डच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेल्या मोबाईल क्रमांकासाठी उपलब्ध आहे) काही सूचना तुमच्या स्क्रीनवर येतील. तुम्हाला त्यानुसार पुढील माहितीसाठी १ क्रमांक लिहून मेसेज पाठवावा लागेल. तुम्हाला त्यानंतर एक १२ आकडी आधारकार्ड क्रमांक दिला जाईल. बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक लिंक आहे की नाही हे त्यानंतर मोबाईल स्क्रिनवर समजेल.

मोबाईल आणि आधार कार्डाचे लिकिंगदेखील ऑनलाईनच्या स्वरूपात करता येणे सुकर होणार आहे. तुम्ही १ डिसेंबरपासून घरबसल्या लिकिंग करू शकता. ८ फेब्रुवारी २०१८ ही तारीख मोबाईल आणि आधारकार्डाच्या लिकिंगसाठी अंतिम असेल. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डाशी लिंक नसल्यास तो बंद होईल.

Leave a Comment