असा आहे न्यूझीलंड देश


जगातील सर्वात कमी प्रदूषण असलेला देश अशी तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाणही सर्वात कमी असलेला देश अशी न्यूझीलंडची ओळख आहे. या देशाबद्दल अधिक जाणून घेणेही मनोरंजक आहे.


या देशात एकूण जिवंत प्राण्यांमध्ये माणसांची संख्या केवळ ५ ट्क्के आहे तर बाकी संख्या जनावरांची आहे. असे असले तरी येथे साप नाहीत. समजा एखादा साप दिसलाच तर त्वरीत पोलिसांत त्याची माहिती द्यावी लागते. या देशात जगातील सर्वात छोट्या आकाराचे डॉल्फिन आहेत. आणि या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे किवी. १९ व्या शतकात येथे डॉल्फिनना समुद्री धोके तसेच खडकांपासून जहाजाचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. येथे लांडगांच्या संख्या नागरिकांच्या संख्येच्या नऊपट आहे.

हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याची दोन राष्ट्रगीते आहेत. या देशाचा जन्म ८०० वर्षांपूर्वीचा आहे. त्यापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती. सर्वात कमी लोकसंख्येचा हा देश असून येथील लेाकसंख्या आहे ४५ लाख. मात्र येथील नागरिकांना कारचा शौक मोठ्या प्रमाणात असल्याने या देशातील कार्सची संख्या आहे २५ लाख. हा देश शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.


माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक एडमंड हिलरी याच देशाचे होते. तसेच प्लॅस्टीक सर्जरीचा शोध लावणारे हेराल्ड गिल्डेज हेही याच देशाचे नागरिक. येथे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास करताना आवश्यक असल्यास युरेनियम तसेच थोरियम अशी भयानक स्फोटके जवळ बाळगण्याची परवानगी आहे मात्र त्याचा स्फोट झाला तर १० लाख डॉलर्स दंड भरावा लागतो.


या देशातील ब्ल्यू लेक नदीचे पाणी जगातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते. १८९३ मध्येच या देशाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला व असा अधिकार देणारा जगातला हा पहिला देश ठरला. येथे समलैगिक विवाहांना मान्यता आहे. या देशात एकही न्यूकिलअर पॉवर स्टेशन नाही. तसेच तुरूंगातील कैद्यांमध्ये ९६ टक्के पुरूष कैदी आहेत. येथे नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर संडे या सणांदिवशी टिव्हीवर जाहिराती दाखविण्यास बंदी आहे.

Leave a Comment