नाहरगडावरील कामगार का घाबरून पळून जात होते?


संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीला चित्रपटाला होत असलेला विरोध कायम असून आता चित्रपटाच्या विरोधात एक गंभीर वळण गाठले आहे. राजधानी जयपूरमधील नाहरगढ किल्ल्याच्या तटबंदीवर एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे धक्काच बसला आहे. या मृतदेहाच्या बाजूला असलेल्या भिंतीवर पद्मावतीचा विरोध, त्याचबरोबर मृतदेहाशेजारी भिंतीवर कोळशाने आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही, असे लिहिले आहे.

नाहरगढ हा किल्ला भारतातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. जेथे पर्यटक येत जात असतात. पण हा किल्ला भयाण म्हणून देखील ओळखला जातो. कारण येथे अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्थान झपाटलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. चला जाणून घेऊया नाहरगढ किल्ल्याशी संबंधित काही गोष्टी ज्या लोकांकडून ऐकल्या आहेत…

राजस्थान पर्यटनाच्या अधिकृत संकेत स्थळानुसार, अरवली पर्वतरांगांमध्ये आणि जयपूरच्या जवळ नाहरगढ किल्ला राजा जयसिंह यांनी १७३७मध्ये बांधला होता. १८६८मध्ये हा किल्ला बनून तयार झाला. नाहरगढ म्हणजे वाघांचे घर. या किल्ल्याचे पहिले नाव सुदर्शशगड असे होते. या किल्ल्यात राण्यांसाठी १२ विशेष खोल्या बांधण्यात आल्या होत्या आणि राजासाठी एक उत्तम खोली बांधण्यात आली. आजही हा महल लोकांसाठी एक आवडता ठिकाण आहे.

असे म्हटले जाते कि किल्ल्याच्या बांधकामादरम्यान अशा अनेक घटना घडल्यामुळे येथे काम करणारे कामगार घाबरून जात असे आणि दुसऱ्या दिवशी ते जे काही काम करीत असत त्याला तोडले मोडले जात असे. ज्यामुळे कामगार खूप घाबरले होते.नाहरगढ किल्ल्याजवळ एक मोठे जंगल आहे. असे म्हटले जाते की येथील राजे तेथे शिकार करायला जात असे. या जंगलाला आजही धोकादायक मानले जाते कारण येथे प्राणी फिरत असतात. म्हणून पर्यटकांना जंगलापासून दूर ठेवले जाते.

दरम्यान ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण राजस्थानमध्ये करण्यात आले. नाहरगढवर देखील या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. यानंतर या किल्ल्याची प्रसिध्दी वाढली होती. एवढेच नाही तर, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या शुध्द देश रोमांस या चित्रपटाचे चित्रीकरण देखील येथेच झाले आहे.

Leave a Comment