ही सरकारी योजना देते २१ लाख रिर्टन्सची गॅरंटी


जर तुम्हाला २१ लाख रुपयांचे खात्रीलायक इन्कम हवे असल्यास तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. यात कुठलाही धोका नाही. केंद्र सरकारची सार्वजनिक भविष्य निधी म्हणजे पीपीएफ योजना तुम्हाला १५ वर्षांत २१ लाख रुपयांचे खात्रीलायक उत्पन्न रिटर्न देईल. या श्रेणीतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या व्यतिरिक्त जे पैसे आपण गुंतवणार आहात त्यावर आपण मिळविलेले उत्पन्न कर-मुक्त असणार आहे. म्हणजेच यावर आपल्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.

तुम्हाला पीपीएफमधून १५ वर्षात २१ लाख रुपयांचे खात्रीलायक उत्पन्न मिळविण्यासाठी या योजनेत तुम्हाला एका वर्षात १.५ लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा आहे, म्हणजे, आपण या योजनेमध्ये अधिक पैसे गुंतवू शकत नाही. अशाप्रकारे तुम्ही १५ वर्षांत पीपीएफमध्ये २२,५०,०००/ – गुंतवणूक करावी लागणार आहे.

पीपीएफमध्ये दर वर्षी १.५ लाख रुपये गुंतविल्यास १५ वर्षापर्यंत आपली एकूण जमा रक्कम २२,५०,००० इतकी असेल. पहिल्या वर्षापासून आपल्या गुंतवणूकीवर दरवर्षी ७.८ टक्के व्याज दराने व्याज मिळेल. अशाप्रकारे, १५ वर्षांनंतर आपल्याला एकूण सुमारे २१ लाख रुपये व्याज मिळेल.

३ लाख रुपयांचा होणार आपला फंड
वार्षिक गुंतवणूक १,५०,०००/-
गुंतवणूक कालावधी १५ वर्षे
मिळणारे व्याज ७.५%
एकूण निधी ४३ लाख

टीप – सध्या पीपीएफवरील व्याजदर 7.8 टक्के आहे. सरकार दर तीन महिन्यांनी पीपीएफवरील व्याज दरांची आढावा घेणार आहे. ही गणना चालू व्याज दरावर आहे.

१५ वर्षांनंतर आपले पीपीएफ अकाऊन्ट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात ४३ लाख रुपये जमा असतील.या रकमेवर आपल्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.

Leave a Comment