गेल्या ५०० वर्षात येथे झाली नाही भाडेवाढ


जर्मनीतील आक्झबर्ग मध्ये एक प्राचीन रोमन कॅथॉलिक वस्ती आहे. डेर फुगरी नावाची ही वस्ती १५२१ साली श्रीमंत व्यापारी, खाणमालक जेकब फुगेर याने बांधली असून तेव्हापासून आजतागायत या वस्तीत राहणार्‍यांना घराचे भाडे वाढविले गेलेले नाही. त्यावेळी येथे वर्षाला १ हेनिश ग्युल्डर म्हणजे साधारण ८३ रूपये भाडे ठरविले गेले होते व आजही तेच कायम आहे.

ही वस्ती जगातील सर्वात प्राचीन सोशल हौसिंग कॉम्प्लेकस म्हणून ओळखली जाते. येथे ६७ इमारतीतीत १४० अपार्टमेंट आहेत व तेथे १५० लोक राहतात. येथे एक चर्च, १ म्युझियमही आहे. आजही या वस्तीला फुगर फौंडेशनकडून मदत दिली जाते. या वस्तीत राहण्यासाठी कांही अटी आहेत. त्यानुसार किमान २ वर्षे ऑक्सबर्ग येथील रहिवासी असणे, धर्माने कॅथॉलिक असणे व कोणत्याही कर्जाशिवाय गरीब असणे आवश्यक आहे. या वस्तीला ५ गेटस आहेत व आजही ती रात्री १० वाजता बंद केली जातात.

Leave a Comment