बाजारात आला आहे नोकियाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन


मुंबई : तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन बाजारात नोकिया कंपनी आणत असून नुकतीच भारतात विक्रीस असणाऱ्या नोकिया २ ची किंमत जाहीर करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन देशातील अग्रगण्य रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. याची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तीन रंगात नोकियाचा हा स्मार्टफोन पूर्ण ब्लॅक, पूर्ण व्हाईट आणि कॉपर ब्लॅक या रंगात उपलब्ध असणार आहे.

या स्मार्टफोनसोबत रिलायन्स जिओची ऑफरही असणार आहे. ४५ जीबी अतिरिक्त डेटा नोकिया २ ग्राहकांना देत आहे. दर महिन्याला ३०९ किंवा त्यापेक्षा जास्त आणि ९ महिने रिचार्ज करणे ग्राहकांना आवश्यक आहे. त्याचबरोबर या फोनसोबत अपघाती विमाचीही सुविधा देण्यात आली आहे.

याफोन्म्ध्ये ५ इंच LTPS एचडी डिस्प्ले (७२०x१२८० पिक्सल), १.३GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१२ प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी (१२८ जीबीपर्यंत वाढवू शकता), अॅण्ड्रॉईड ७.१ अपडेट होणारे वर्जन, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा तर फ्लॅशसहीत ५ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीसाठी नोकिया २ मध्ये ४ जी व्हीएलटीई, वाय-फाय ८०२.११, बी / जी / एन, ब्लूटूथ v४.१, जीपीएस / ए-जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-यूएसबी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. नोकिया २ हा स्मार्टफोन ६,२९९ रुपयांना उपलब्ध असेल.

Leave a Comment