वेफर्सच्या चवीचे गवत


युनिर्व्हसिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील संशोधकांना पर्थ शहरात गवताची नवी प्रजाती योगायोगानेच सापडली आहे. म्हणजे त्यांनी ही प्रजाती शेाधण्यासाठी कोणतेही संशोधन केलेले नाही तर अचानकच ती गवसली आहे. दिसायला सर्वसामान्य गवतासारखेच दिसणारे हे गवत चवीला मात्र खारवलेल्या वेफर्ससारखे आहे. ट्रीओडिया सँटीलान्स असे त्याचे नामकरण केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या भागात संशोधकांची एक टीम काम करत असताना त्यातील एका संशोधकाकडून चुकून त्याचा हात चाटला गेला. त्याला असे आढळळे की त्याच्या हाताला सॉल्टेड चिप्सचा फ्लेवर येत आहे. त्याने वेफर्सतर खाल्लेच नव्हते मग ही चव कशी याचा प्रश्न त्याला पडला. नंतर त्याला आठवले की कांही वेळापूर्वी त्याने बाहेरचे गवत काही कारणाने हातात पकडले होते व त्यानंतर हात धुतले नव्हते. हे गवत अनोखे नाही कारण ऑस्ट्रेलियाबाहेरही काही ठिकाणी ते आढळते. या प्रकारच्या सात जाती संशोधकांनी त्यानंतर शोधल्या आहेत.

Leave a Comment