फोनवरून संभाषणाची सुरवात हॅलो ने का?


टेलिफोन जगात वापरात आला त्यालाही आता अनेक वर्षे लोटली. आता डायल फोनऐवजी स्मार्टफोन अशी क्रांती झाली मात्र अजूनही फोनवर संभाषण सुरू करताना ते हॅलो या शब्दाने केले जाते. यामागचे कारण आपल्याला बहुतेक माहिती नसते. २१ नोव्हेंबर १९७३ या दिवशी जागतिक हॅलो दिन साजरा करण्याची प्रथा पडली असून हा दिवस नुकताच साजरा झाला. त्या निमित्ताने या हॅलोमागचा इतिहास जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

हॅलो या शब्दाचा वापर संवाद वाढविण्यासाठीही केला जातो. फोनवरील संभाषण सुरू करतानाही प्रथम हाच शब्द वापरला गेला होता. त्यामागची कथा अशी, टेलिफोनचा शोध लावणारा संशोधक ग्रॅहैम बेल याने फोनच्या शोधाबरोबरच फोनवरून होणार्‍या संभाषणाची भाषाही सोपी व छोटी असावी यासाठी प्रयत्न केले होते. हॅलो हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. त्यामागे कारण मात्र वेगळे होते. बेलची गर्लफ्रेंड मार्गारेट हॅलो हिच्यावर त्याचे खूप प्रेम होते व तो तिला हॅलो नावानेच बोलवत असे. टेलिफोनवरून प्रथम संभाषण करतानाही त्याने हॅलो हाच शब्द उच्चारला होता. त्यानंतर अमेरिकन संशोधक थॉमस एडिसन यानेही १८७७ मध्ये पिटसबर्ग सेंट्रल डिस्ट्रीक्ट फंड प्रिटींग टेलिग्राफ कंपनीचे अध्यक्ष स्मिथ यांना पत्र लिहून हॅलो हा शब्द खूपच सोपा व अर्थपूर्ण असल्याने स्वागतासाठी हाच शब्द वापरला जावा अशी विनंती केली होती.

कांही जणांच्या मते हॅलो हा फ्रेच शब्द होता व त्याचा अर्थ थांबा व लक्ष द्या असा आहे.

Leave a Comment