आता हॉलमार्कसह बनणार चोवीस कॅरेट सोन्याचे दागिने


भारतीयांना असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या क्रेझमध्ये आता नव्याने भर पडणार असून यापुढे चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दागिनेही बाजारात येणार आहेत व शुद्धतेच्या हॉलमार्क शिक्क्यासह हे दागिने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान यांनी भारतीय मानक ब्युरोला २४ कॅरेट सोने दागिन्यांसाठी हॉलमार्क मानके निश्चित करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सांगितले. हॉलमार्क चाचण्या करण्यासाठी वापरात असलेल्या प्रयोगशाळांना त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार लवकरच सर्व सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक करणार आहे. सध्या १४, १८ व २२ कॅरट सोने दागिन्यांसाठी हॉलमार्क केले जाते मात्र ग्राहकांना हॉलमार्कचेच दागिने खरेदी करण्याचे बंधन नाही. भारतात २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याचे दागिने बनविले जात नाहीत. कारण या कॅरेटचे सोने मृदू असल्याने दागिने बनू शकत नाहीत. मात्र परदेशात विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे असे दागिने बनविणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे २४ कॅरेटसाठीही हॉलमार्क करता येणार आहे. देशात अंदाजे ४ लाख सराफ असून त्यातील २१६९२ जणांनी हॉलमार्क लायसेन्स घेतलेले आहे. सध्या हॉलमार्क परिक्षणे खासगी प्रयोगशाळामधूनच केली जात आहेत.

Leave a Comment