जाणून घ्या फेसबुकवर व्हायरल झालेल्या सलमानच्या मार्कशीट मागील सत्य


नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या एक फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. विद्यापीठाच्या एका चुकीमुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. सर्वत्र हा एक फोटो व्हायरल होत आहे. ही एका विद्यापीठाची मार्कशीट असून ती दुसऱ्या-तिसऱ्या माणसाची नसून ती आहे बॉलिवूड स्टार सलमान खानची. या मार्कशीटवर सलमानचा फोटो देखील लावण्यात आला आहे. ही मार्कशीट बी.ए. प्रथम वर्षाची असून जी आग्रा विद्यापीठाने दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ही मार्कशीट अमृतसिंह स्मारक पदवी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याची आहे. मार्कशीटमध्ये खान असे लिहिलेले असून ज्याने कॉलेजमधून ३५ टक्के गुण मिळवून बॅचलरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्याच्या फोटोच्या जागी अभिनेता सलमान खानचा फोटो लावण्यात आला आहे.


या मार्कशीटमधील विद्यार्थ्याने ३५% गुण मिळवून प्रथम वर्ष पास झाला आहे. एवढेच नव्हे तर या मार्कशीटमध्ये भीमराव आंबेडकर विद्यापीठही असेही लिहिले आहे. त्यानंतर शिक्षण खाते खडबडून जागे झाले. एवढी मोठी चूक कशी झाली हे कोणीही समजू शकले नाही. आग्रा विद्यापीठाशी १००० पेक्षा जास्त महाविद्यालये संलग्न आहेत. २०१६-१७मध्ये ७.२ लाख विद्यार्थी नोंदणीकृत झाले आहेत. ही चूक तेव्हा लक्षात आली जेव्हा मार्कशीटचे क्रॉस-चेकिंग करण्यात आले.

Leave a Comment