ज्या मंदिरासमोर मागितली भीक; त्याच मंदिराला केले लाखोंचे दान


आपण आतापर्यंत भिकाऱ्यांना पैसे देत आहोत, परंतु कर्नाटकातील म्हैसूरमधील भिकारी या वस्तुस्थितीला उलटा करत आहेत. तिने एका मंदिराला एवढा पैसा दान केला की जे तुम्ही ऐकाल तर हैराण होऊन जाल.

वास्तविक, ही घटना म्हैसूरच्या व्हँटिकॉप्पेलमध्ये प्रसन्न अंजने स्वामी मंदिरातील असून येथे, ८५ वर्षीय भिकारी सितालक्ष्मी भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. ती दिव्यांग असल्यामुळे मागील १० वर्षांपासून भीक मागण्याचे काम करत असून एवढ्या वर्षात तिने अडीच लाख रुपये जमा केले होते. आपल्या दैनंदिन गरजांवर खर्च केल्यानंतरही तिच्याकडे दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. जी तिने मंदिर ट्रस्टला दान केली.

असे म्हटले जात आहे की ही पहिलीच वेळ नाही जेव्हा सितालक्ष्मी मंदिरात पैसे देत होती. यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळात तिने सुमारे ३०००० रूपये मंदिर ट्रस्टला दान केले आहेत. सितालक्ष्मीचे असे मानने आहे की देव तिच्यासाठी सर्वकाही आहे. म्हणूनच तिने आपले पैसे मंदिरासाठी दान दिले. आता तिची काळजी मंदिर ट्रस्ट द्वारा घेतली जात आहे.

मंदिर ट्रस्टचे चेअरमन एम. बसवराज यांच्या मते, सितालक्ष्मी निर्मळ मनाची असून, ती मंदिरात येणा-या भाविकांच्या मागे कधीही भिकेसाठी मागे लागत नाही. मंदिरात येणारे भाविक त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पैसे देत असतात. मंदिराला पैसे दान करून त्यांनी चांगले कार्य केले आहे.

असे सांगितले जात आहे की सितालक्ष्मीला आमदार वासु मंदिरच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या मते, नेते किंवा एक मोठा अधिकारी, जो कोणी सितालक्ष्मीबद्दल ऐकतो, तो त्यांचे कार्य ऐकून दंग होऊन जातो. मोठे-मोठे अधिकारीही त्यांच्या कार्याला सलाम करतात.