बंगलोरच्या विनय फॅशन्सने बनविला जगातील मोठा ब्लाऊज


बंगलोर येथील व्यावसायिक विनय फॅशन्सच्या मालक अनुराधा ईश्वर यांनी जगातील सर्वात मोठा ब्लाऊज बनविला असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. हा ब्लाऊज ३० फूट उंच, ४४ फूट रूंद असून गिनीज बुकने त्याला वर्ल्डस लार्जेस्ट ब्लाऊज म्हणून मान्यता दिली आहे. या ब्लाऊजमुळे तीन मजली इमारत पूर्ण झाकली गेली आहे.

अनुराधा ईश्वर म्हणाल्या, हे आव्हान नक्कीच सोपे नव्हते. पाच कारागिर सतत ७२ तास त्यासाठी काम करत होते. यासाठी २८० मीटर कापड व त्याला २० मीटर पायपिंग लागली. सेंट सोफिया कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये तो पाहण्यासाठी ठेवला गेला आहे. या ब्लाऊजची नोंद लिम्का बुक, इंडिया बुक, वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया बुक, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम वर्ल्ड रेकॉर्डस, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस अशा अनेक रेकॉर्ड बुकमध्ये घेतली गेली आहे. अनुराधा यांना ही प्रेरणा त्यांचा मुलगा विनय याच्याकडून मिळाली. विनय अभियंात्रिकीचा विद्यार्थी असून याच्या नावावरही चार रेर्कार्ड नोंदली गेली आहेत.

Leave a Comment