देशातील सर्वात जुनी वाडिलाल आईस्क्रीम कंपनी विक्रीसाठी


देशातील सर्वात जुनी आईस्क्रीम ब्रँड कंपनी वाडिलाल आईस्क्रीम विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अहमदाबाद च्या ८० वर्षे जुन्या या कंपनीची मालकी गांधी परिवाराकडे असून त्यांच्याकडे कंपनीचे ६५ टक्के शेअर्स आहेत. गांधी परिवारात वारसा हक्कावरून कांही कुरबुरी सुरू झाल्यानंतर कंपनीचे एक मालक विरेंद्र गांधी त्यांच्या हिश्श्याचे शेअर विकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाँबे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड असलेल्या या कंपनीने लिंकन इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट यांची या व्यवहारासंदर्भात बँकर म्हणून निवड केली असून ते कंपनी खरेदी करू इच्छीणार्‍या ग्राहकांशी बोलणी करणार आहेत.

फ्रोझन फूड सेगमेंटमध्ये वाडिलालचा बाजारातील हिस्सा सर्वाधिक आहे. मात्र कंपनीचे मालक या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. कंपनीचे मूल्यांकन लिंकन इंटरनॅशनल करणार असली तरी किती हिस्सा विकायचा व किती किमतीला विकायचा याचा निर्णय मालक घेणार आहेत. कंपनीचे ६० ट्क्के शेअर विक्रीला आले तरी त्याची किंमत अंदाजे ६०० कोटी रूपये असेल असाही अंदाज वर्तविला जात आहे. २०१५ पासून कंपनीत वारसा वाद सुरू आहेत. गैरव्यवस्थापन व अनियमिततेचे आरोप कांही मालकांविरूद्ध केले जात आहेत मात्र हा झगडा न्यायालयाबाहेरच मिटविला गेला असल्याचेही समजते.

Leave a Comment