शाओमीसाठी काढा फोटो आणि जिंका १९ लाखांचे बक्षीस


एक अनोखी छायाचित्रांची स्पर्धा शाओमी या गाजलेल्या मोबाईल कंपनीने जाहीर केली असून कंपनीने यामध्ये सहभागी होण्यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. यास्पर्धेची प्रमुख अट म्हणजे शाओमीचा एमआय ए१ हा मोबाईल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की केवळ एमआय यूजर्सच या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. कंपनीने आपला हा स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी बाजारात लाँच केला होता. ड्युएल रिअर कॅमेरा असणारा कंपनीचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला जवळपास १९ लाख ५२ हजारांचे बक्षीस, तर दुसऱ्या क्रमांकाला ६ लाख ५० हजारांचे आणि तिसऱ्या क्रमांकाला ३ लाख २५ हजारांचे बक्षिस मिळणार आहे. एमआय ए१ हा फोन वापरुनच एक फोटो यामध्ये सहभागी असणाऱ्यांना काढायचा आहे. एमआय ए १ नसलेलेही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. पण त्यासाठी सर्वात चांगल्या फोटोला वोटींग करावे लागणार आहे. शाओमी कंपनीकडून यामध्ये जिंकणाऱ्यांना रेडमी नोट ४ आणि एमआय ए १ जिंकण्याची संधी मिळणार आहे.

भारत, रशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धकांना यासाठी ११ डिसेंबरपर्यंत फोटो पाठविणे बंधनकारक असून २० डिसेंबरपर्यंत विजेत्यांची घोषणा होईल असे कंपनीने सांगितले आहे.

Leave a Comment