फेसबुकवरूनही करता येणार खरेदी विक्री


फेसबुक लवकरच भारतात अॅपवरचे मार्केटप्लेस नावाचे नवे फिचर सुरू करणार असून याच्या माध्यमातून ग्राहक आपले जुने नवे सामान खरेदी अथवा विक्री करू शकणार आहेत. याच्या चाचण्या सध्या मुंबईत सुरू असून त्या यशस्वी ठरल्या तर देशभरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे समजते.

ऑनलाईन मार्केटमध्ये देशात सध्या ओएलएक्स, क्विकर सारख्या कंपन्या प्रस्थापित असून फेसबुकच्या मार्केटप्लेसला त्यांच्याशी टककर द्यायची आहे. मार्केटप्लेस वर विक्री करण्यात येणार्‍या सामानाचे फोटो अपलोड करून त्याची अॅड देता येणार आहे. ग्राहक अशा सामानाची यादी ब्राऊज करू शकतील. हे अॅप अमेरिका व अन्य २५ देशांत यापूर्वीच वापरात आहे व नव्याने ते १७ देशांत सुरू झाले आहे. त्यात इंग्लंड, फ्रान्स व जर्मनी या देशांचाही समावेश आहे.

ग्राहकाला अॅपवरील शॉप बटण दाबून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सामानाची यादी पाहता येईल. भारतात सध्या ओएलएक्स मजबूत स्थितीत आहे मात्र मार्केटप्लेसचे ग्राहक या फिचरवर सेलरचे प्रोफाईल पाहू शकणार आहेत व यामुळे सेलरची प्रामाणिकता तपासणे शक्य होणार आहे.

Leave a Comment