वीजनिर्मिती करण्यासाठी माणसांना मदत करणार ‘कोंबडी’


होय, एखादी किरकोळ कोंबडीही आता वीजनिर्मितीच्या कामी येऊ शकते. कोंबडीच्या विष्ठेपासून आग आणि वीज उत्पादनासाठी इंधन म्हणून वापरले जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

कोंबडी आणि पोल्ट्रीत पाळलेल्या पक्ष्यांच्या विष्ठेवर प्रक्रिया (ट्रीटमेंट) केली तर कोळशाच्या जागी इंधन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. यामुळे हवेत मिसळणाऱ्या ग्रीनहाउस वायुंमध्ये घट होऊ शकते आणि तसेच ऊर्जा निर्माण करण्याचा तो पर्यायी स्रोत होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

इस्राएलमधील बेन गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव्ह या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. ‘अप्लाईड एनर्जी’नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार, कोंबडीच्या विष्ठेवर प्रक्रिया करून त्याचे बायोमास ईंधन बनविले जाते. हे ईंधन वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या 10 टक्के कोळशाची जागा घेऊ शकते.

पोल्ट्रीतून निर्माण होणाऱ्या विष्ठेचे शास्त्रज्ञांनी दोन वेगवेगळे इंधनाचे प्रकार तयार केले. यातील एक बायोचार असून दुसरा हायड्रोचार हा आहे. यातील हायड्रोचार या प्रकारातून 24 टक्के जास्त ऊर्जा तयार केली जाऊ शकते, असे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

Leave a Comment