केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत निघाली बंपर नोकर भरती


केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत (सीजीएचएस), चेन्नईने १०४ पदांसाठी बंपर नोकर भरतीची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये फार्मेसिस्ट, नर्सिंग ऑफिसर्स, लेडी हेल्थ व्हिजिटर इत्यादींचा समावेश असून या पदांसाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतून देखील भरती करण्यात येईल. या पदासाठी आपण जर इच्छुक उमेदवार असाल तर आपण ४ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज कसा करावा, यासाठी असलेली शैक्षणिक पात्रतेबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

शैक्षणिक पात्रता:
फार्मासिस्टच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवारांनी डी. फार्म आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समतुल्य पास असलेल्या बी. फार्म आणि २ वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

लेडी हेल्थ व्हिजिटरच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता: इच्छुक उमेदवारांना उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समतुल्य पास असणारी डिप्लोमा आणि १ वर्षाचा काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: उमेदवाराच्या फार्मासिस्टच्या पदासाठी किमान वय, १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे आणि लेडी हेल्थ व्हीजिटरच्या पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३० वर्षे असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा या आधारावर केली जाईल.

अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या वेबसाइट www.cghsrecruitment.mahaonline.gov.in च्या माध्यमातून ०४.११.२०१७ ते ०४.१२.२०१७ दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क: उमेदवारांनी इंटरनेट बँकिंगद्वारे ५०० रूपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. अनुसूचित जाती / जमाती, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

अधिक माहितीसाठी, खालील दुव्यावर क्लिक करा-
http://cghsrecruitment.mahaonline.gov.in/PDF/General_Guidelines.pdf
http://cghsrecruitment.mahaonline.gov.in/MR/RecruitmentMainPage.aspx