८वी नापास मुलगा झाला करोडपती; रिलायन्सपासून अमूलपर्यंत आहेत त्यांचे ग्राहक


नवी दिल्ली: आपल्या मराठीत एक म्हण आहे शिकाल तर टिकाल. हे सूत्र प्रत्येक पालक आपल्या मुलांना सांगत असतात. कारण शिक्षणामुळेच यश गाठतात येते आणि आपल्याला हवी असलेली समाजातील जागा मिळते. पण एका मुंबईच्या मुलाने या म्हणीला पलटून टाकले आहे. मुंबईत राहणा-या त्रिशनित अरोराला अभ्यासात रुची नव्हती. ज्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. पण त्याच्या याच आवडीमुळे त्याला यश मिळाले आणि आज २३व्या वर्षी तो सायबर सुरक्षा विशेषज्ञ (सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट) बनला आहे. त्याने आपली प्रेरणादायी कथा बॉम्बेच्या ह्यूमन ऑफ फेसबुक पेजवर शेअर केली आहे. ज्यात असे म्हटले आहे की शाळा सोडल्यानंतरही त्याला हे यश कसे मिळाले.

त्रिशनित अरोरा याने सांगितले की, त्याला लहानपणापासून संगणक क्षेत्रात रस होता. तो सर्व वेळ व्हिडिओ गेम खेळत असे. तो दिवसभर कॉम्प्युटर बसत असे त्यामुळे त्याच्या वडिलांमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे त्याचे वडील दररोज संगणकाचे पासवर्ड बदलत असे. पण ते पासवर्ड त्रिशनित दररोज तोडत असे, पण एक दिवस त्याचे वडील हे पाहून प्रभावित झाले आणि त्याला एक नवीन संगणक आणून दिला आणि एक दिवस असा आला की त्याचे जीवनच बदलून गेले.

एके दिवशी त्रिशनितच्या शाळेच्या प्राचार्याने त्याच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून सांगितले की तुमचा मुलगा ८वीत नापास झाला आहे. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला एकदाच विचारले की तुला आयुष्यात पुढे काय करायचे आहे. त्यानंतर त्याने निर्णय घेतला की तो संगणक क्षेत्रात स्वत:चे करिअर करेल. त्यानंतर शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्याने संगणकातील बारकावे शोधण्यास केली.

वयाच्या १९ व्या वर्षी त्याने कॉम्प्युटर फिक्सिंग आणि सॉफ्टवेअरचे निवारण करायला शिकले होते. त्यानंतर त्याने लहान प्रकल्पांवर काम करायला सुरवात केली. त्याला त्याचा पहिला चेक ६० हजार रुपयांचा मिळाला होता. त्यानंतर त्याने पैशांची बचत करून आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये गुंतवण्याचा विचार केला. आज त्याची टीएसी सिक्युरिटी सोल्यूशन ही कंपनी आहे. जी एक सायबर सुरक्षा कंपनी आहे आठवीत नापास झाल्यानंतर त्याने शाळा सोडली. नंतर बाहेरून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि बीसीएचे शिक्षण पूर्ण केले. पण त्याआधी त्याने आपल्या यशाला गवसणी घातली होती.

त्रिशनित अरोरा जेव्हा २१ वर्षांचा होता तेव्हा त्याने आपली कंपनी सुरू केली. त्रिशनित आता रिलायन्स, सीबीआय, पंजाब पोलिस, एव्हॉन सायकल यासारख्या कंपन्यांना सायबरशी संबंधित सेवा देत आहेत. त्याने हॅकिंगवर पुस्तके देखील लिहिली आहेत. त्याने “हॅकिंग टॉक विद त्रिशनित अरोरा”, “हॅकिंग एरा” आणि “हॅकिंग विथ स्मार्ट फोन” अशी पुस्तके लिहिली आहेत.

आज मितीस त्याच्या कंपनीची भारतात चार तर दुबईत एक कार्यालय आहे. सुमारे ४०% ग्राहक याच कार्यालयातून व्यवहार करतात. जगभरात ५० फॉर्च्युन आणि ५०० कंपन्या त्याचे ग्राहक आहेत. त्रिशनितचे एक स्वप्न आहे की अरब डॉलर सुरक्षा कंपनी उभारायची आहे. भारताशिवाय टीएसी दुबईहूनही काम करते, सुरुवातीच्या दाव्यांनुसार, देशांतर्गत बाजार आणि मध्य पूर्व त्याने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईची कमाई केली आहे.

Leave a Comment