हे २० मोबाईल अॅप्लीकेशन चोरत आहेत तुमची पर्सनल माहिती


तुमच्यासाठी तुम्हाला जवळचे वाटणारे, दैनंदिन वापरातील हे २० मोबाईल अॅप्लीकेशन किती घातक होते हे तुम्हाला जर समजले तर धक्काच बसेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या या मोबाईल अॅप्लीकेशनची नाव समजल्यास तुमचाच राग येईल. कारण हे दाखविण्यापुरती मोबाईल अॅप्लीकेशनचे काम करत असले तरी यांचे खर काम हे तुमची माहिती लीक करणे हे आहे. असे असले तरीही आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. कारण गुगलने आक्रमक पाऊल उचलत हे अॅप्लीकेशन डिलीट केले आहेत.

गुगलने आपल्या दैनंदिन वापरातील २० अॅप्लीकेशन्सना काढून टाकले आहे. या अॅप्लीकेशन्सची चोरी युजर्सची जासूसी करताना पकडण्यात आली आहे. हे अॅप्स युजर्सचे ई-मेल, टेक्स्ट, वॉईस कॉल्स, लोकेशन याचसोबत वैयक्तीक माहितीवरही लक्ष ठेवून होते. हे अॅप्लीकेशन १०० पैक्षा जास्त मोबाईलमध्ये इंस्टॉल होते.
जुन्या एंड्रॉइड वर्जनच्या फोनमधील संवेदनशील माहिती या अॅप्लीकेशनमध्ये असलेल्या लिपिज्जा नावाचा स्पाईवेयरमुळे गोळा केली जात होती. हे प्रकरण एवढे गंभीर आणि भयानक होते की गुगलने या प्रकरणावर अख्खी ब्ल़ॉग पोस्ट लिहीली. या अॅप्लीकेशनमध्ये असे कोड होते ज्यांच्यामदतीने फंक्शन परफॉर्म केले जाऊ शकत होते.

कॉल रेकॉर्डिंग, VoIP रेकॉर्डिंग, डिवाइसच्या माइकहून रेकॉर्डिंग, लोकेशन मॉनिटरिंग, स्क्रीनशॉट्स एप्स, फोन कॅमेरातून फोटो घेणे, डिवाइसची माहिती आणि फाइल्स एक्सेस करणे, कॉंटॅक्ट, कॉल लॉग, एसएमएस, अॅप्लीकेशनचा डेटा एक्सेस करणे, अशा अॅप्लीकेशन्सनी जीमेल, हॅंगआऊट, मेसेंजरसारख्या अॅप्लीकेशनकडची माहिती गोळा केली. तसेच अॅप्सचे मेसेजही वाचत होते.

गुगलने हे अॅप्लीकेशन्स ब्लॉक केल्याचे आम्ही सुरुवातीलाच सांगितले. त्यानंतर थोडे फरक करुन पुन्हा एकदा पहिल्यासारख्या फॉर्मेटमध्ये हे अॅप्स पुन्हा आणण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात या अॅप्लीकेशनमधून जणू काही मोबाईलमधील फाईल्सचा बॅकअप घेण्यासाठीच काम सुरु असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत होता. या अॅप्सना ब्लॉक केले तर हे क्लीनर, नोटपॅड, साऊंड रेकोर्डिंग आणि अलार्म मॅनेजरच्या अॅप्लीकेशनसारखे दिसू लागले.

गुगलच्या ब्लॉगमध्ये पुढे सांगण्यात आले की, लिप्पिजा एक मल्टिस्टेज स्पाइवेअर असून जे युजर्सच्या ईमेलमध्ये घुसू शकतात. हे स्पाईवेअर युजर्सचे मेसेज, लोकेशन, वॉईस कॉल्स आणि मीडियालाही एक्सेस करु शकतात. २० लिपिज्जाने खुप चालाखीने १०० पेक्षा कमी अॅप्समध्ये उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. गुगलने आपल्या डेव्हलपर्स आणि या अॅप्सना एंड्रॉइड इकोसिस्टीमवरुन ब्लॉक केले आहे.

हे अॅप एकदा इंस्टॉल केल्यानंतर सेकंड स्टेजला लाइसेंस वेरिफिकेशन करवतात. मग डिवाइस स्कॅन करुन डेव्हलपरकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या सर्वरवर डेटा पाठवत असत. कंपनीने सांगितले की आम्ही गुगल प्ले प्रोटेक्टच्या स्पाइवेअर पकडण्याच्या क्षमतेला वाढविले आहे. गुगलने युजर्सच्या सुरक्षेसाठी त्यांना काही सल्ला दिला आहे.

गुगल प्ले प्रोटेक्टचा तुम्ही हिस्सा आहात का? हे सुनिश्चित करा.
गुगल प्ले स्टोअरचाच वापर करा. कारण बाकी इंस्टॉल मॅकेनिजमपेक्षा हे सुरक्षित आहे.
अननोन सोर्सेसचा वापर करत नसाल त्यांना डिसेबल करा
आपल्या फोनवर नवीन एंड्रॉइड सिक्युरिटी नक्की अपडेट करा.

Leave a Comment