रिक्षात सापडले नवजात बाळ; ट्विटरवर मुंबईच्या मुलाने मागितली मदत…


मुंबई: आपल्या दिवसांदरम्यान अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे आपण उदास आणि दुखी होऊन जातो. पण आश्चर्य वाटते कोणीतरी अशा देखील गोष्टी करू शकतो. विशेषतः अशा गोष्टी लहान मुलांशी संबंधीत असेल तर, हे विचित्र आणि अस्वस्थ वाटते. पण मग असे देखील लोक आहेत जे मानवतेवर आपल्या चांगल्या उद्देशाने आणि निर्णयांसह आपला विश्वास पुन्हा स्थापित करतात. मुंबईच्या एका मुलाने हेच सिद्ध झाले आहे. या मुलाने या नवजात बाळाला मुंबईच्या पोलिसांच्या मदतीने जीवनदान दिले आहे.

रविवारच्या रात्री ट्विटर युजर @Jugadu_banda याने तीन-पाच दिवसांच्या एका नवजात बाळाचे फोटो ट्विटरवर ट्विट केले की आपल्याला मुंबईतील बंद ऑटो रिक्षामध्ये एक बाळ बेवारस स्थितीत सापडले आहे.


अमनच्या या ट्विटवर अनेक लोकांनी त्याला असे सल्ले दिले की त्याला हे पोलिसांना सांगण्याची गरज आहे. अमन म्हणाला की, पोलीस काहीच प्रतिसाद देत नाही आणि मुलीची परिस्थिती बिघडत आहे. पोलीस प्रतिसाद देत नसल्याचे बघत आणखी एका ट्विटर युजरने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि लगेचच या प्रकरणाची दखल घेण्यासाठी विनंती केली. याला सोशल मीडियाची ताकद म्हणावी लागेल की मुंबई पोलिसांनी लगेचच ट्विटवर कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या ट्विटनंतर ताबडतोब अमनने एक फोटो शेअर केला त्यात हे नवजात बाळ एका महिला कॉन्स्टेबलच्या हातात होते.


यानंतर बऱ्याच लोकांनी अमनला ट्विट केले आणि मुलांच्या आरोग्याविषयी आणि सुरक्षेबाबत चौकशी करायला सुरुवात केली. चांगली गोष्ट म्हणजे योग्य काळजी व दूध मिळाल्यानंतर बाळाचे आरोग्य लगेच सुधारले आणि तिचे थरथरणे बंद झाले. मुलीला सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमन आता मुलीला एका अनाथ आश्रमामध्ये दाखल करण्यासाठी हालचाल करत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील अमनची प्रशंसा करत म्हटले आहे कि तो या मुलीजवळ देवदूत बनून पोहचला.