मुंबई : सॅमसंग गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस हे आपले दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग लवकरच लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC 2018) लाँच होणार आहेत. याबाबत आतापर्यंत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण अगदी जोरात या फ्लॅगशिप स्मार्टफोनची चर्चा आहे. गॅलक्सी एस९ आणि एस९ + यांचे रिपोर्ट सतत समोर येत आहेत. दरम्यान असे सांगण्यात येत आहे की, गॅलक्सी एस ८ प्रमाणे इन्फिनिटी डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये असून ज्याचे आस्पेक्ट रेशियो १८:९ असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे.
लवकरच लाँच होणार सॅमसंगचे एस ९ आणि एस ९ प्लस स्मार्टफोन
६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस असणार आहे. तसेच एस ९ २५६ जीबी लिमिटेड वेरिएंट देखील असेल. फोनमध्ये अॅड्रॉयड ओरियो ८.० आणि क्वॉलकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल. भारतात हा स्मार्टफोन क्वॉलकॉमशिवाय Exynos चिपसोबत लाँच होणार आहे. बाजारात या दोन स्मार्टफोनची चर्चा असल्यामुळे ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. ग्राहकांच्या पसंतीला सॅमसंग कंपनी कायमच उतरली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या दोन नव्या स्मार्टफोनसाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.