जिओच्या फोर जी फिचरफोनला चिनी चिप


रिलायन्स जिओ इनफोकॉमने देशात स्वस्त फोरजी फिचर फोन वितरणाला सुरवात केली असताना या फोनसाठी चिप व अन्य सुटे भाग बनविण्यात चिनी कंपनीने रस दाखविला असून त्या संदर्भात या दोन कंपन्यांत चर्चा सुरू असल्याचे चिनी कंपनी स्पेडट्रमचे अध्यक्ष लिओ ली यांनी सांगितले. ते म्हणाले दोन्ही कंपन्यातील चर्चा आता अंतिम टप्प्यात असून या वर्षअखेर आम्ही १ कोटी युनिटसाठी चिप पुरवणार आहोत.

स्प्रेडट्रम कंपनी भारतात फोन डिझाईन तयार करण्यासाठी स्थानिक फोन निर्मात्या कंपन्यांबरोबरही चर्चा करत आहे. मायक्रोमॅक्स बरोबरच अन्य हँडसेट उत्पादक कंपन्यांशी त्यांची बोलणी सुरू आहेत. यामुळे कमी किमतीत ४ इंची फिचर फोन देणे शक्य होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जिओकडून मात्र या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.

Leave a Comment