वन प्लस टी फाईव्ह लाँच


वन प्लसने गुरूवारी न्यूयॉर्क इव्हेंटमध्ये वन प्लस टी फाईव्ह हा नवा फ्लॅगशीप फोन सादर केला असून तो वन प्लस फाईव्हच्याच किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. ६.१० इंची फुल एचडी व पातळ बेजल असलेल्या या स्क्रीनला कॉर्निंग गुरिल्ला २.५ ग्लास प्रोटेक्शन दिले गेले आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये आहे. ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज व ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज अशी ही दोन व्हेरिएंट असून त्यांच्या किंमती ३२९९९ पासून सुरू होत आहेत. ८ जीबी रॅमसाठी ३७९९९ रूपये मोजावे लागतील.

सध्या हा फोन फक्त मिडनाईट ब्लॅक रंगात उपलब्ध करून दिला जात आहे. अमेझॉन वर तो २१ नोव्हेंबरपासून अमेझॉन प्राईम ग्राहकांसाठी उपलब्ध असेल तर २८ नोव्हेंबरपासून तो अमेझॉन व वन प्लस स्टोअर्समध्ये सर्वांसाठी उपलब्ध होईल. १२ महिन्याच्या अॅक्सिडेंटल वॉरंटीसह तो उपलब्ध केला जात आहे. एचडीएफसी क्रेडीट डेबिट कार्डवर १५०० रूपये डिस्काऊंट दिला जाणार आहे व त्याची मुदत आहे २ डिेसेंबर.

या फोनला अँड्राईड नगेट ७.१.१, ड्युल सिम, ८३५ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, १६ व २० एमपीचे दोन रियर कॅमेरे, त्यात टेलिफोटो लेन्सच्या जागी वाईड अँगल लेन्स असून एलईडी फ्लॅश दिला गेला आहे. फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा आहे. फिंगरप्रिट सेन्सर रियर साईडला आहे. बॅटरी क्विक चार्ज सपोर्टसह आहे.

Leave a Comment