तानाशाह मुगाबेच्या बायकोचा असा आहे शाही थाट


झिम्बाब्वेच्या लष्कराने केलेल्या उठावामुळे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे आणि त्यांची पत्नी ग्रॅसी मुगाबे २५ बेडरूमवाल्या ४४ एकरच्या भव्य राजवाडा असलेल्या ब्लू हाऊसमध्ये नजरकैद झाले आहेत. मुगाबेपेक्षा ४१ वर्षांनी लहान असलेली त्यांची पत्नी ग्रेस आपल्या शाही जीवनशैलीमुळे ओळखली जाते. झिम्बाब्वेमध्ये दारिद्र्य आणि उपासमार सुरु असताना महागड्या पार्ट्या आणि लाखो रुपयांची खरेदी त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. विकीलीक्सने त्यांचा डायमंड घोटाळा उघडकीस आणला. त्याद्वारे आलेली रक्कम तिने आपले कपडे, शूज आणि शाही थाटावर उडविली आहे.

विकीलीक्सच्या रिपोर्टनुसार ग्रेसने चेसजवा हिऱ्याच्या खाणीमधून हिरे काढण्यासाठी व्यक्तिगत माणसे गोळा केली होती. ही माणसे लपून-छपून ग्रेससाठी हिरे चोरी करायचे. हे हिरे विकून ग्रेसने भरपूर पैसा गोळा केला आणि आपल्या ऐशो-आरामवाल्या जीवनावर उडवला. ग्रेसने दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे ३००० स्टायलिश चप्पला आणि महागडे कपडे विकत घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. ग्रेसचा पॅरीस दौरादेखील खूप काल चर्चेत होता. तिने एका दिवसाच्या खरेदीसाठी लक्झरी वस्तूंवर ६४ लाख रु. खर्च केले. ग्रेस मार्च २०१४मध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी खजिन्यातील ३० दशलक्ष पौंड (सुमारे २६ कोटी) खर्च केले होते. याशिवाय दक्षिण आफ्रिकेमध्ये तिच्याकडे अनेक सुविधांनी युक्त घर आहे, जिथे ते नेहमी सुट्टी साजरी करण्यासाठी जात असते. अलीकडेच तिने ३ दशलक्ष पाउंड (सुमारे २६ कोटी) रुपयांची रॉल्स रॉयस कार विकत घेतली

ग्रेस सुरुवातीच्या दिवसात मुगाबेच्या कार्यालयात एक टायपिस्ट म्हणून काम करत होती. काही काळानंतर रॉबर्टने तिची सचिव पदी नियुक्ती केली. याच दरम्यान या दोघांच्या जवळकीच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर दोघांनी १९९६ मध्ये विवाह केला. मुगाबे याच्या पहिल्या पत्नीचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला.

Leave a Comment