भारताची आर्थिक पत वाढल्याचे मूडीजचे निरीक्षण


नवी दिल्ली – भारताच्या मानांकनात मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने वाढ केली असून भारताच्या मानांकनात १३ वर्षांनंतर मूडीजने वाढ केली आहे. मूडीजने ‘Baa3’ वरुन ‘Baa2’ असे भारताचे क्रेडिट रेटिंग केले आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावरुन विरोधकांकडून टीका केली जात असताना सरकारच्या या दोन्ही निर्णयांचे मूडीजने तोंडभरुन कौतुक केले आहे.

भारतातील आर्थिक सुधारणा विचारात घेऊन मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली आहे. भारताच्या रेटिंगमध्ये गेल्या १३ वर्षांमध्ये मूडीजने वाढ केली नव्हती. मात्र मूडीजने २००४ नंतर प्रथमच भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली आहे. आतापर्यंत भारताला मूडीजकडून ‘Baa3’ रेटिंग देण्यात आले होते. भारताला हे रेटिंग २००४ मध्ये देण्यात आले होते. पण भारताचे रेटिंग आता ‘Baa2’ करण्यात आले आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून ‘Baa3’ निच्चांकी दर्जा दाखवणारे रेटिंग आहे. मूडीजकडून याआधी २०१५ मध्ये भारताचे रेटिंग स्थिरवरुन सकारात्मक करण्यात आले होते.

Leave a Comment