चीनमध्येही होत आहे भारतीय उत्पादनाचा मोठा खप


बीजिंग – भारतातील ई-कामर्स वेबसाईट्स एका ठराविक उत्सवादरम्यान मोठ्या सेलची घोषणा करतात आणि मोठ्या प्रमाणात ज्यामध्ये सूट दिली जाते. भारतात फ्लिपकार्ट, अॅमेझोन या सारख्या वेबसाईट्स प्रसिद्ध आहेत. पण ई-कामर्स संकेतस्थळे चीनमध्येही त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात भरघोस सूट देतात.

भारताचे प्रसिद्ध ब्रँड पतंजलि, अमूल, एमडीएच मसाले, टाटा चहा, गीट्स डाबर व हिमालया या कंपनीच्या उत्पादनांची चीनमधील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ११/११ सिंगल्स डे असे चीनमधील या कार्यक्रमाला म्हटले जाते. चीनमधील या कार्यक्रमात लोक ही उत्पादने मोठ्या प्रमाणात संकेतस्थळावरुन खरेदी करतात.

मुद्रित किमतीच्या दुप्पट किंवा तिप्पट भावाने जरीही या वस्तू विकल्या जातात तरीही तेथील लोक या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. भारतीयांसह पाकिस्तानी, जपानी, अरब, आफ्रिकन व युरोपियन लोकांचा खरेदीदारांमध्ये समावेश असतो. भारतीय पदार्थांची अन्य देशातील लोकांना आवड असल्याने मोठ्या प्रमाणात ऑनलाईन भारतीय उत्पादने विकली जातात.

चीनमध्ये भारतीय खाद्यपदार्थांसह इतर भारतीय उत्पादनांचीही मोठी बाजारपेठ आहे. ऑनलाईन साईट्स वरुन चीनी व्यापारी खरेदी करुन किंवा दुकानात भारतीय उत्पादनांची विक्री करतात. चीनच्या प्रत्येक शहरात जवळपास भारतीय उत्पादनाची विक्री करणार एक दुकान असते.

Leave a Comment