‘या’ बँकेत खाते असल्यास मिळणार नाही गॅस सिलेंडर अनुदान


नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरवर केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. पण एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी अनुदान न जमा करण्याचे म्हटले आहे.

मंत्रालयाने सांगितलं आहे की, सिलेंडर अनुदानासाठी ज्या ग्राहकांनी अर्ज केला आहे आणि एअरटेल पेमेंट बँकेत त्यांचे खाते आहे अशा ग्राहकांना गॅस सबसिडीचा लाभ मिळणार नाही. एलपीजी ग्राहकांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार, घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान त्यांच्या खात्यात जमा होत नाही. यावर मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ज्यांचे बँक खाते एअरटेल पेमेंट बँकेत आहे अशा प्रकारच्या तक्रारी अशा ग्राहकांकडून आल्या आहेत.

एक टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी म्हणून एअरटेलची ओळख आहे, गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी आपल्या ग्राहकांना पेमेंट बँकेची सुविधा देत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एअरटेल पेमेंट बँकेत ज्या ग्राहकांचे खाते आहे आणि त्यांनी ते खाते आधारसोबत लिंक केले असेल तरच त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात आहे.

Leave a Comment