पृथ्वीवर माणसांसाठी जागा कांही वर्षात अपुरी ठरणार व येथील साधनसंपत्ती कमी पडणार यासाठी अनेक देश मंगळ, चंद्रावर मानवी वसाहती उभारण्याच्या प्रयत्नात असताना फ्रान्सने समुद्रात तरंगणारे स्वतंत्र शहर विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. दक्षिण पॅसिफिक समुद्रात अन्य जगापासून पूर्णपणे वेगळे असे हे शहर जमिनीवरील शहरांप्रमाणेच सर्व सुविधांनी युक्त असेल व त्यासाठी ११३५ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.
फ्रान्समध्येही बनते आहे तरंगते शहर
मिळालेल्या माहितीनुसार २०२० सालापर्यंत या ठिकाणी ३००च्या आसपास लोक राहायला जातील व २०५० पर्यंत तेथे हजारो लोक निवास करतील. या शहराचे डिझाईन असे केले जात आहे की पुढील १०० वर्षे तेथे कोणतीही नवीन बांधकामे सहज करता येतील. पॉलीनेशिया सरकार व सस्टेंडिग इन्स्टिट्यूट यांच्यात यासाठीचा करार जानेवारी २०१७ मध्यें केला गेला आहे. या ठिकाणी समुद्रात ११८ बेटांचा समूह आहे मात्र समुद्रपाण्याची पातळी वाढली की ही बेटे बुडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे येथे तरंगते शहर बनविले जात आहे. पाणीपातळी वाढली तरी त्याचा धोका शहराला पोहोचणार नाही कारण ते तरंगणारेच आहे.
या शहरात शेती, पाण्यातील विशेष शेती, हेल्थ केअर, वैद्यकीय संशोधन केंद्र, पॉवर हाऊस असेल तसेच बांबू, लाकूड, नारळाच्या झावळ्या, प्लॅस्टीक, रिसायकला केलेले धातू यांचा वापर बंाधकामात केला जाणार आहे.