अंडी शाकाहारी की मांसाहारी?


थंडी आली की अंडयांचा खप वाढतो असे बाजार सांगतात.प्रोटीन पुरविणारी अंडी लोकांनी मुबलक खावीत म्हणून रोज खा अंडे अशा जाहिरातीही केल्या जातात. मात्र अंडे शाकाहारी लोकांना वर्ज्य मानले जाते कारण अंडे मांसाहारी आहे असा समज पूर्वीपासूनच आहे. प्रत्यक्षात अंडे शाकाहारी असल्याचा दावा केला जातो. यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात.

मांस खाणारे ते मांसाहारी अशी व्याख्या केली जाते. त्या दृष्टीने पाहिले तर अंड्यात मांसाचा भाग नसतो. अंडी कोंबडी देते पण त्यासाठी कोंबडी मारली जात नाही. जसे गाईचे दूध शाकाहारी तसेच अंडेही या कारणास्तव शाकाहारी मानले जाते. अंड्यात जीव नसतो. अंड्याचे तीन भाग कवच, पांढरा बलक व पिवळा बलक. यातील पांढरा बलक प्रोटीनचा भाग आहे. जनावराचा कोणताच भाग त्यात नाही. त्यामुळे एग व्हाईट हे नक्की शाकाहारी आहे.

राहता राहिला तो पिवळा बलक. यात प्रोटीन, कोलेस्टोरॉल व फॅट आहे. या भागातील गॅमिट पेशी वेगळ्या काढता येत नाहीत. त्यामुळे हा भाग मांसाहारी मानला जाऊ शकतो. पण बाजारात जी अंडी उपलब्ध असतात, त्यातील बहुतांशी अनफर्टिलाईज्ड असतात. म्हणजे ही अंडी उबविली तरी त्यातून पिलू बाहेर येईलच याची खात्री नसते. याचाच अर्थ अशी अंडी जीव नसलेली आहेत म्हणजे ती शाकाहारी मानली गेली पाहिजेत असा दावा केला जातो. शेवटी अंडे ज्याला खायचे आहे त्याने ते शाकाहारी आहे का मांसाहारी याचा विचार न करता खावे हे उत्तम.

Leave a Comment