कोस्टल इकॉनॉमिक झोनची सुरवात महाराष्ट्रापासून


केंद्र सरकारने देशात १४ विविध ठिकाणी सागरमाला प्रकल्पांतर्गत कोस्टल इकॉनॉमिक झोन उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्यातील पहिल्या प्रकल्पाची सुरवात महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पासून केली जात आहे. हे औद्योगिक विभाग प्रामुख्याने माल उत्पादनाला प्रोत्साहन देणार असून त्यामुळे प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देशातील सर्वात व्यस्त पोर्ट असून येथून एकूण उलाढालीच्या ४० टक्के आयातनिर्यात केली जाते. या ट्रस्टकडे मुबलक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वप्रथम येथेच २०० हेक्टर जागेत ऑटोमोबिल, टेलिकॉम, आयटी क्षेत्रातील ४५ कंपन्यांनी गुंतवणूक करण्यात उत्सुकता दाखविली असून पहिल्या टप्प्यात १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत असे समजते.

Leave a Comment