एअरटेलचे आणखीन २ स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल


नवी दिल्ली – आणखीन २ स्वस्त स्मार्टफोन बाजारात जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने सादर केले. यावेळी मोबाईल निर्माता कंपनी कार्बनसोबत मिळून एअरटेलने हे ४जी स्मार्टफोन आणले आहेत. मेरा पहला स्मार्टफोन योजनेंगर्तत कंपनीने हा किफायतशीर फोन देखील सादर केला. व्होडोफोनने देखील या अगोदर ९९९ रुपयांच्या किमतीत आपला ४जी स्मार्टफोन मायक्रोमॅक्सच्या मदतीने बाजारात उतरविला आहे.

१५०० रुपयांमध्ये जिओकडून बेसिक ४जी फोन सादर झाल्यानंतर आतापर्यंत ४ स्वस्त स्मार्टफोन एअरटेलने आणले आहेत. आपला पहिला स्मार्टफोन कंपनीने कार्बन ए४० सादर करत त्याची किंमत १३९९ रुपये ठेवली. तर त्यानंतर दुसरा फोन सेलकॉन स्मार्ट ४६ बाजारात उतरविला. कार्बन ए १ इंडियन आणि ए ४१ पॉवर हे नवे फोन आहेत. ए १ इंडियनची प्रारंभिक किमत १७९९ रुपये तर ए४१ पॉवरची प्रारंभिक किंमत १८४९ रुपये असेल. यावर कंपनीने कॅशबॅक ऑफर देखील देण्यात आली आहे पण एक अट कंपनीकडून कॅशबॅक मिळविण्यासाठी ठेवण्यात आली. यांतर्गत ३६ महिन्यांपर्यंत दर महिन्याला १६९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. जर असे केले नाही तर कॅशबॅक मिळणार नाही.

Leave a Comment