आता पुन्हा पाहता येणार व्हॉटसअॅपवरून डिलीट केलेले मेसेज!


नवी दिल्ली – जगभरातील सर्वांचेच मन फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉटसअॅपने जिंकले असून अगदी कमी कालावधीत एकमेकांशी संपर्क साधायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत असणारे हे साधन लोकप्रिय झाले.आपल्या युजर्सला व्हॉटसअॅप कायमच जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याच्या प्रयत्नात असते. ते ठराविक कालावधीने त्यासाठी नवनवीन प्रयत्न करताना दिसतात. व्हॉटसअॅपने नुकतेच एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरचे नाव डिलीट फॉर एवरीवन असे असून युजर्सला यामध्ये कोणाला आपण चुकून पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचण्याआधी डिलीट करता य़ेणार आहेत.

आता आणखी एक आश्चर्याची बाब यामध्ये समोर आली आहे. एक अनोखे अॅप्लिकेशन एका स्पॅनिश वेबसाईटने तयार केले असून व्हॉटसअॅपचे डिलीट केलेले मेसेज या अॅप्लिकेशनमार्फत आपल्याला पुन्हा पाहता येणार आहेत. या अॅप्लिकेशनचे नाव नोटिफिकेशन हिस्टरी असे असून ते व्हॉटसअॅप यूजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

आपण अनेकदा मोबाईलमधील मेमरी फुल होत असल्याच्या कारणाने व्हॉटसअॅपमधील मेसेज डिलीट करतो. पण या अॅप्लिकेशनवर सध्या अनेक महत्त्वाची कामेही अगदी सहज होतात. पण ऐनवेळी डेटा डिलीट केल्याने आपली अडचण होते. या वेबसाईटने युजर्सची हीच अडचण लक्षात घेऊन हे अॅप्लिकेशन डेव्हलप केले आहे. स्पॅनिश कंपनीशी यासाठी व्हॉटसअॅपने टायअप केले आहे. तुम्हाला या नवीन फिचरचा लाभ घेण्यासाठी तुमचे व्हॉटसअॅप अकाऊंट अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतर नोटिफीकेशन हिस्टरी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. तुम्हाला व्हॉटसअॅपमधील एखादा मेसेज पाहायचा असेल आणि त्यावर तो मेसेज डिलीट झाला आहे, असे नोटिफिकेशन येत असेल तर नोटिफिकेशन हिस्टरीमध्ये जाऊन तो मेसेज पुन्हा पाहता येणार आहे.

Leave a Comment