राजकारण्याची सोशल मिडीयावरची भन्नाट टोपण नांवे


गुजराथ निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगाने भाजपला पप्पू शब्दाचा वापर करण्यास बंदी केली असल्याची बातमी मुख्य बातमी बनली असली तरी प्रत्यक्षात अशी नांवे भारतात अनेक राजकारण्यांना मिळाली आहेत व ती लोकप्रियही झाली आहेत. ही नांवे सोशल मिडीयावर जास्त करून आली व ती नेत्यांची वर्तणूक व काम करण्याची त्यांची पद्धत यावरून दिली गेली आहेत. अशी टोपण नांवे मिळण्यात केवळ राहुल गांधीच नाही तर पंतप्रधान मोदींपासून माजी राष्ट्रपती प्रवणदा अशा सर्व थरातील नेत्यांचा समावेश आहे.

पप्पू हे टोपणनांव राहुल गांधी यांना सोशल मिडीयातूनच मिळाले आहे. अर्थात त्यांचा उपहास करण्यासाठी हे नांव अधिक वापरले गेले. आता भाजप मात्र पप्पू ऐवजी राहुल यांचा उल्लेख युवराज असा करणार आहे. राहुल गांधी यांना जसे पप्पू नांव मिळाले तसे पंतप्रधान मोदी यांना फेकू नाव मिळाले आहे व त्याचा वापरही सोशल मिडीयावर सर्रास केला जात आहे.


काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह हे दिग्गी राजा या नावाने फेमस झाले आहेत तर बहुजनसमाज पार्टीच्या नेत्या मायावती बेहनजी नावाने सोशल मिडीयावर चर्चेत असतात. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिदी या टोपण नावाने चर्चेत आहेत तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे दादा आहेत.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनेकदा मफलर गुंडाळलेल्या अवस्थेत दिसतात व यामुळे सोशल मिडीयावर ते मफलर मॅन आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी आँटी नॅशनल नावाने सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहेत. निवडणूक आयेाग सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या नावांवर बंदी घालू शकत नाही कारण ही नांवे कोण देतो याचाच पत्ता तेथे लागू शकत नाही.

Leave a Comment