जिओनीचा दमदार बॅटरीवाला नवा फोन लाँच


नवी दिल्ली : एम ७ पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन जिओनीने भारतात लाँच केला आहे. या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ५०००mAh क्षमतेची बॅटरी आणि ६ इंच आकाराची स्क्रीन ही आहेत. सप्टेंबर महिन्यातच हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

भारतात जिओनी एम ७ पॉवरची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरपासून या फोनची विक्री अमेझॉनवर सुरु होईल. अनेक लाँचिंग ऑफर्सही या फोनच्या खरेदीसोबतच देण्यात येणार आहेत. १००जीबी अतिरिक्त डेटा जिओकडून देण्यात येईल.

जिओनी एम ७ पॉवरमध्ये अँड्रॉईड ७.१.१ नॉगट, ६ इंच आकाराची एचडी स्क्रीन, १.४GHz ऑक्टा कोअर, स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर, ४जीबी रॅम, ६४जीबी इंटर्नल स्टोरेज, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment