बहुगुणकारी अंजीर


निरनिराळ्या ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे, ही निसर्गाने मनुष्याला दिलेली देणगीच आहे. ही ताजी रसरशीत फळे शरीराच्या आरोग्याकरिता अतिशय लाभदायक असतात. आहारचे योग्य संतुलन राखायचे असेल, तर भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये इत्यादींच्या बरोबर फळांचाही समावेश आहारामध्ये असायला हवा. अशाच फळांपैकी एक फळ म्हणजे अंजीर. हे फळ ताजे आणि सुकविलेले अश्या दोन्ही प्रकारे खाता येते. अंजीर आरोग्याला अतिशय फायदेशीर असून, याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.

अंजिराचे सेवन लो किंवा हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहे. अंजीरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असून, हा क्षार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. ज्यांच्या शरीरामध्ये या क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजीराचे सेवन करायला हवे. अंजीरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रेक्रीयेला अवरोध निर्माण होईल.

अंजीर या फळाप्रमाणेच त्याची पाने ही गुणकारी आहेत. अंजीराची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स ची मात्रा नियंत्रित राहते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर चरबी साठविली जाते, त्याला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. जर ह्याची मात्रा शरीरामध्ये वाढली, तर लठ्ठपणा, हृदयरोग इत्याधी व्याधी उद्भवू शकतात. अंजीरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच अंजीर खाण्याने अधिक फायबरची मात्रा पोटामध्ये जात असून त्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहून भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी अंजीरे खावीत. तसेच ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांनी अंजीरे दुधामध्ये भिजवून खावीत.

मासिक धर्म बंद झाला असणाऱ्या, चाळीशी च्या महिलांसाठी अंजीराचे सेवन अतिशय लाभकारी आहे. त्याने शरीरामध्ये कॅल्शियम मिळते, तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते. डांग्या खोकला आणि दम्याच्या विकारात देखील अंजिराचे सेवन गुणकारी आहे. तसेच बद्धकोष्ठ, अपचन, पोटदुखी सारख्या विकारांसाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजिराच्या सेवनाने यकृताचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment