ग्राहकांना लवकरच फुकट शॉपिंगची सेवा देणार जिओ


नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर रिलायन्स जिओ आता आणखी एक धमाका करणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्राहकांना फ्रि शॉपिंग करवण्याची तयारी जिओ करत आहे. जिओ देशातील वाढत्या डिजिटल पेमेंटला बघता आता ई-कॉमर्स मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत असून जिओ या माध्यमातून लोकप्रिय अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांना टक्कर देणार आहे.

याबाबत कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्नर स्टोर, किराणा दुकाने आणि कंज्यूमर ब्रॅण्डससोबत जिओ संपर्कात आहे. जिओ मनी प्लॅटफॉर्मचा वापर जिओचे ग्राहक करत आहेत. डिजिटल कूपनच्या माध्यमातून शेजारच्या दुकानातून खरेदी केली जात आहे. सध्या मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये जिओ ई-बिझनेस सुरू करत आहे. ही सेवा येत्या काही दिवसात इतरही शहरांमध्ये सुरू होईल.

जिओसोबत गेल्या एका वर्षात १३.२ कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. यात त्यांचे प्लॅटफॉर्म अजिओचा सुद्धा समावेश आहे. ऑनलाईन टू ऑनलाईन ई-कॉमर्समध्ये प्रवेश केलेल्या पेटीएम आणि फोनपे सारख्या कंपन्याकडे आता जिओ लक्ष देत आहे. कॉर्न स्टोर आणि इतर ब्रॅन्डसोबत मिळून पेटीएमसारखी कंपनी बिझनेस करत आहे. यांना नेटवर्कचे आक्रामक रूप बदलण्यासाठी गुंतवणूकदारांची मदत मिळते. तेच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सुद्धा किराणा सामानाचा डिलेव्हरी बिझनेस सुरू करत आहे.

सूत्रांनुसार, ई-कॉमर्स बिझनेस मॉडेलला आतापर्यंत जिओने अंतिम रूप दिलेले नाही. यात दुस-या शहरांमधील रिसर्चनंतर बदल केले जातील. पायलट प्रोजेक्टसाठी आयटीसी, विप्रो, डाबर, टाटा बेवरेजेज, गोदरेज कन्जूमर आणि अमूल यासारखे ब्रॅन्डचा जिओने समावेश केला आहे.

Leave a Comment