शाओमी बनली भारतातील नंबर १ स्मार्टफोन कंपनी


चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी भारतीय बाजारात नंबर वन स्मार्टफोन विक्री कंपनी बनली असून रेडमी नोट ४ हा भारतात सर्वाधिक विक्री होत असलेला फोन बनला आहे. कंपनीने आपल्या यशात आणखी एकाची भर घातली आहे. स्मार्टफोन ट्रॅकर च्या अहवालानुसार लेटेस्ट तिमाहीत शाओमी सर्वात वेगाने वाढलेला स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. कंपनीने भारतीय बाजारात २३.५ टक्के हिस्सा मिळविला असून या काळात ९२ लाख स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.

कंपनीची वाढ वर्षात ३०० टक्के झाली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या टॉप पाच स्मार्टफोनमधील रेडमी नोट ४, रेडमी ४ व रेड मी ४ ए हे खूपच लोकप्रिय ठरले आहेत. ऑनलाईन स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा ५१ टक्कयांवर गेला असून २० सप्टेंबर ते १९ आक्टोबर या काळात कंपनीने ४० लाख स्मार्टफोन विकले आहेत. शाओमीने २०१४ मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला होता.

Leave a Comment