वाराणसी २०१९ पूर्वीच होणार स्मार्ट


पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ व भारताचे सर्वात प्राचीन शहर वाराणसी २०१९ पूर्वीच स्मार्ट सिटी बनविले जाणार आहे. जपानच्या क्योटो शहराप्रमाणे त्याचा विकास जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये मोदींना सभेसाठी जेथे परवानगी नाकारली गेली होती त्या बेनिया बागेत शहनाईउस्ताद बिस्मिलाँखान यांच्या शहनाईच्या सुरांवर नाचणारे कारंजे बनविले जात असून येथे दिव्यांग मुलांसाठी अत्याधुनिक क्रिडा सुविधा दिल्या जात आहेत. शहरातील चार महत्त्वाच्या पण बिकट परिस्थितीत असलेल्या उद्यानांचे जागतिक पातळीच्या दर्जाच्या उद्यानांत रूपांतर केले जात आहे.

या चार बागांपैकी एक युवांसाठी सेल्फी पाक, दुसरे गुलाब व अत्तर नमुन्यांचे पार्क, तिसर्‍यात लाईट अँड शेड इफेक्ट साठी स्क्रिन तर चौथ्या बागेत ग्रीन टनल बनविला जात आहे. वाराणसी विकासासाठी सुरू असलेल्या सर्व कामांवर पंतप्रधान स्वतः नजर ठेवून आहेत. वाहतूक कोंडी साठी बदनाम असलेल्या ६१ चौकांमध्ये विशेष व्यवस्था केली जात असून येथे इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तैनात केली जात आहे. शहरात सर्वत्र वायफाय सुविधा, पर्यटकांसाठी खास अॅप, सीसीटीव्ही नेटवर्क उभारले जात आहे. ३६ हजार पथदिवे एलईडी मध्ये बदलले जात आहेत. वाहने उभी करण्यासाठी बहुमजली वाहनतळ उभारले जात आहेत.

वाराणसीत दरवर्षी ७० लाख पर्यटक येतात. या पर्यटकांना शहराची सर्व माहिती एकाच जागी मिळावी यासाठी काशी मोबाईल अॅप तयार केले जात असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment