या भारतीय तरूणाने स्थापला स्वतःचा देश


इंदोरमधील एका युवकाने स्वतःचा स्वतंत्र देश बनविला असून या देशाला संयुक्त राष्ट्राने मान्यता द्यावी यासाठी आवाहन केले आहे. सुजय दीक्षित नावाच्या या युवकाने इजिप्त व सुदान या दोन देशांमधला कोणाच्याही मालकीचा नसलेला ८०० मैल भाग त्यासाठी निवडला असून या देशाचे नांव त्याने किंगडम ऑफ दीक्षित असे ठेवले आहे. फेसबुकवर या संदर्भात त्याने घोषणा केली असून स्वतःला या देशाचा राजा घोषित केले आहे. देशाचा ध्वजही त्याने येथे फडकविला आहे.

इतिहासात या भागाचे नांव नाविल असे आहे. सुजय सांगतो या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याने ३१९ किमीचा प्रवास केला आहे. तो इजिप्तमधून निघाला तेव्हा तेथे शूट अॅट साईट अशी ऑर्डर दिली गेली होती. त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीतून तो सुटला व या ठिकाणी येऊन पोहोचला. येथे येण्यासाठी रस्ता नाही व सर्व भाग वाळवंट आहे. येथे कुणीही आरामात प्रवेश करू शकतो कारण या भागावर कोणाचीच मालकी नाही. सुजय म्हणतो या वाळंवटात त्याने कांही बिया पेरल्या असून त्यांना पाणीही घालतो आहे.

या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती व लष्कर प्रमुख म्हणून त्याने वडीलांची नियुक्ती केली आहे. या देशाची वेबसाईटही तयार केली आहे. तो म्हणतो, येथे रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. ज्यांना रोजगार हवा असेल त्यांनी त्यासाठी अर्ज करावेत. सध्या या देशाची लोकसंख्या १ आहे व राजधानीचे नांव आहे सुयशपूर. देशाचे स्थापना साल ५ नोव्हेंबर २०१७ आहे व येथील राष्ट्रीय पशू म्हणून पालीची निवड केली गेली अहे. कारण सुयशने येथे आजपर्यंत फकत पालीच पाहिल्या आहेत.

Leave a Comment