हा डॉक्टर देतो रुग्णाला हनुमान चालिसा वाचण्याचा सल्ला


आजारी पडल्यानंतर सर्वसामान्यपणे रुग्ण डॉक्टरला या आशेने गाठतो की डॉक्टर औषध आणि चांगले उपचार करून सर्वकाही ठिक करेल. पण जर एखाद्या डॉक्टरने दररोज हनुमान चालिसा वाचण्याचा सल्ला आणि मंदिरात जाण्याचा सल्ला दिला तर ऐकण्यास जरा अजबच वाटते. कारण डॉक्टरांचे काम आहे योग्य उपचाराने रुग्णाला बरे करणे. परंतु, राजस्थानच्या या डॉक्टरांच्या मते, औषधांसह तो हनुमान चालीसा वाचण्याचा सल्लाही देतो. ही औषधे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्यांनी रुग्णांना हनुमान चालीसा आणि दैनंदिन मंदिरात जाण्याचा सल्ला दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानच्या भरतपूर येथील हे डॉक्टर दिनेश शर्मा आहेत. ६९ वर्षीय दिनेश एक वरिष्ठ सरकारी डॉक्टर देखील राहिले आहेत. ते आता रिटायर झाले असून आपले क्लिनिक सांभाळतात. त्यांनी दिलेली जी औषधे व्हायरल होत आहे ती शेखर नावाच्या एका व्यक्तीची आहेत. जो एक मॅकेनिक असून पोटात दुखत असल्यामुळे तो या डॉक्टरांकडे गेला होता.


चार औषधे लिहून दिनेशने पाचव्या क्रमांकावर हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी लिहिले, दररोज मंदिरात आरती करा. दिनेश म्हणतात की दर दिवशी मंदिरात जाणे आणि हनुमान चालीसाचे वाचल्याने मन: शांती मिळते आणि आजार बरे होतात. दिनेश यांनी आपल्या चिठ्ठीत देवदेवतांचा उल्लेख देखील केला आहे. चिठ्ठीत शीर्षस्थानी असे लिहिले आहे की, डॉक्टर फक्त इलाज करतात आणि देव ठिक करतात. दिनेश म्हणतात मी रुग्णांना अध्यात्मिक डोस देतो. अध्यात्मिकेमुळे त्यांचा त्वरित इलाज होतो.

Leave a Comment