रक्तदाबाची मानके बदलली- १३०-९० नॉर्मल रक्तदाब


आत्तापर्यंत उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी सिस्टॉलिक १४० व डायस्टॉलिक ९० असा रक्तदाब नॉर्मल मानला गेला होता. मात्र आता नवीन संशोधनात अमेरिकेन हार्ट असोसिएशन व अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.त यानुसार आता उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी १३०-९० हा नॉर्मल रक्तदाब मानला जाईल. याचा अर्थ एवढा रक्तदाब असेल तर लगेच औषध सुरू न करता आहारविहार व जीवनशैलतीतील बदलांवर तो नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा फायदा जागतील २५ ते ३० टक्के लोकांना मिळेल.कारण या नव्या मानकांनुसार रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उच्च रक्तदाब असलेले लोक अधिक प्रयत्नशील राहतील. या लोकांनी आहारातील मीठाचे प्रमाण कमी केले, तेलकट खाण्यांवर नियंत्रण ठेवले व वेळेवर पुरेशी झोप व तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न केला तरी त्यांना रक्तदाबासाठी अ्रौषधे न घेताही रक्तदाब नियंत्रित राखता येणार असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

Leave a Comment