शतकांपूर्वीच अस्तित्त्वात होते आयफोन?


आयफोनची जगभरात असलेली क्रेझ कुणालाच नवीन नाही. आयफोनचे नवे मॉडेल आल्यानंतर त्याची खरेदी करण्यासाठी उडत असलेली झुंबडही कुणालाच नवीन नाही. मात्र आयफोन सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्त्वात होते असे सांगितले तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. अर्थात आयफोन पूर्वीच आस्तित्त्वात होते हे सिद्ध करणारे पुरावे आता इंटरनेटवर आले असून त्यासाठी कांही पेटींग्जचा हवाला दिला गेला आहे.


१८६० साली ऑस्ट्रीयन पेंटर फर्डिनाड वलदमुलेरियन याने चितारलेले संडे मॉर्निंग हे चित्र त्यासाठी कारण ठरले आहे. यात एक मुलगा आपल्या प्रेयसीची वाट पाहतो आहे व ती मुलगी हातातील एका यंत्रात पाहण्यात गुंगून गेली आहे. या यंत्रातून येणार्‍या प्रकाशकिरणांनी तिचा चेहरा उजळून निघाला आहे. हे यंत्र स्मार्टफोन प्रमाणेच दिसते आहे. १९३७ सालच्या इटालियन अमबर्ट रोमानाने बनविलेले आणखी एक पेटिंगही नेटवर व्हायरल झाले आहे. यातही अनेक माणसांच्या मधोमध बसलेल्या एका माणसाच्या हातात आयफोनसारखे यंत्र दिसते आहे. हा माणूस सेल्फी काढत असावा असा अर्थ यातून काढला गेला आहे.

या दोन्ही चित्रांमुळे इतिहासकारांमध्ये वाद सुरू झाला आहे. कांही जणांच्या मते या माणसाच्या हातात अ्रसलेली वस्तू कांच असावी तर कांही जणांच्या मते टाईम ट्रॅव्हल च्या माध्यमातून हा माणूस येथे पोहोचला असावा. म्हणजे प्रत्यक्षात तो याच काळातील असेल पण टाईम मशीनमधून तो गतकाळात गेला असावा.

Leave a Comment