इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही करू शकता तुम्ही कमाई


केवळ जगभरातील लोकांशी कनेक्ट होण्याचे माध्यम आजकाल सोशल मीडिया राहिलेले नाही. गूगल, फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर आता योग्य रित्या आणि कल्पकतेने केल्यास हीच माध्यमे आता तुमच्या उत्पन्नाची साधने होऊ शकतात. तुमचा प्रोफाईल फोटो आणि बायो जर का इंस्टाग्रामवर दमदार असेल तर तुमचे फॉलोवर्स वाढवायला तुम्हाला मदत होते. बस्स या दोन गोष्टी म्हणजे इंस्टाग्रामवरून उत्पन्न मिळवण्याची पहिली पायरी आहे. जेवढी जास्त तुमच्या फॉलोअर्सची संख्या तेवढी जास्त तुमची उत्त्पन्न कमवण्याची संधी वाढते.

तुम्ही इंस्टाग्रामवर दमदार प्रोफाईल पिक्चरसोबत किती अ‍ॅक्टिव्ह आहात ? हेदेखील पाहिले जाते. तुम्हांला अकाऊंट बनवल्यानंतर तुमच्या फॉलोअर्ससोबत आणि इंस्टाग्रामवरील इतर युजर्ससोबत सतत संपर्कामध्ये राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.

जितके चांगले फोटो तुम्ही अपलोड कराल तितका तुम्ही युजर्सवर अधिक प्रभाव पाडण्यास यशस्वी ठरू शकता. योग्य हॅशटॅगचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी करणे आवश्यक आहे. तुमच्या फॉलोअर्ससोबत एंगेजमेंट वाढवण्यासाठी त्यांचे फोटो लाईक करा, कमेंट करा सोशल मीडियात अ‍ॅक्टीव्ह राहण्याचा चांगला फोटो, फॉलोवर्ससोबत एंगेजमेंट हा एक भाग झाला. पण तुमच्या मनात आता त्यातून उत्त्पन्न कसे मिळणार ? हा प्रश्न डोकावला असेल. मग ब्लॉगिंगसारखी ही कन्सेप्ट असून लाखोंवर तुमचे फॉलोअर्स गेले की तुम्ही पार्टनर किंवा क्लायंटची सर्व्हिस प्रमोट करण्याची संधी मिळते. क्लायंटचे पॉझिटीव्ह प्रमोशन यामध्ये तुम्हाला करायचे असते.

फेसबुकप्रमाणेच केवळ व्हेरिफाईड आणि व्हीआयपी अकाउंटसाठी ही सोय चांगले काम करते. तुमच्याकडे याकरिता फॉलिवर्स अधिक असणे गरजेचे आहे. म्हणजे क्लायंट किंवा विशिष्ट कंपनीला प्रमोट करण्याची संधी तुम्हाला मिळते. तुम्ही जर उत्तम फोटोग्राफर असाल तर कोणत्याही गॅलरीत तुमचे फोटो नाहीत तर ते फोटो तुम्ही चक्क ऑनलाईन आणि घरबसल्या विकू शकता. याकरिता तुम्ही वॉटरमार्क टाकून फोटो अपलोड करू शकता. फोटोची किंमत, त्याबाबतची माहिती बायोमध्ये लिहून ठेवा. तसेच विक्रीसाठी खुले असलेले फोटो व त्यांची माहिती द्या. तुमच्याकडे खूप फॉलोवर्स आहेत पण त्यांच्याकडे पहायला, सांभाळायला वेळ नसेल तर तुम्ही अकाऊंट विकू शकता. तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट Famewap सारख्या अनेक वेबसाईटवर विकू शकता .