हॉलीवूड चित्रपटात झळकणार दोन मराठमोळे अभिनेते


एकीकडे झाशीच्या राणीवर बॉलिवूडमध्ये मनिनकर्णिका हा चित्रपट बनतो आहे तर दुसरीकडे झाशीच्या राणीवर आधारित चित्रपट बनवण्यात हॉलिवूडनेही रस घेतला आहे. या चित्रपटाचे नाव ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असे आहे आणि अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. हॉलिवूडपटात मराठी कलाकारांना संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वाती भिसे करणार आहे, तर झाशीच्या राणीची भूमिका देविका भिसे साकारणार आहे. चित्रपटात बरेच भारतीय कलाकार असतील. डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटिश कलाकारांसोबतच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अजिंक्य देव तात्या टोपेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे.