पंचिंग मशिनला समर्पित गूगलचे आजचे डूडल


मुंबई : आज एका मशिनला नेहमीच दिग्गज व्यक्तींना आपल्या डूडलद्वारे सलामी देणाऱ्या गूगलने सलामी दिली आहे. १३१वर्षे पंचिंग मशिन अर्थात ‘होल पंचर’च्या शोधाला पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खास डूडल गूगलने तयार केले आहे.

लोगोला रंगबेरंगी रुप देऊन, स्पेलिंगमधील दुसऱ्या ‘जी’ला पानाचे स्वरुप गूगलने दिले आहे आणि त्या पानाला होल पंचर पंच करताना दाखवत जीआयएफ फाईल केली आहे. गूगलने अत्यंत आकर्षक असे डूडल केले आहे. १४ नोव्हेंबर १८८६ रोजी होल पंचरचचे जर्मन शास्त्रज्ञ फ्रेडरिक सिओनेकन यांनी पेटंट मिळवले. याच ब्लाईंडर आणि कॅलिग्राफीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंक पेनसाठीच्या स्पेशल निबचाही शोध फ्रेडरिक सिओनेकन यांनी लावला होता.

आजही जगभरात ISO ८३८ असलेले होल पंचर वापरले जाते. होल पंचर अभ्यास, ऑफिस कामांसाठी अत्यावश्यक असते. सध्या डिजिटल युग असून सगळेजण कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड इत्यादींचा वापर करतात. पण होल पंचरचा वापर आजही कमी झालेला नाही. जिथे कागदपत्रांचा संबंध येतो, तिथे होल पंचर असतेच.