Skip links

आधुनिक युगातील नवे ‘सुपरफूड’ – मशरूम्स


मशरूम्समध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक मात्रेमध्ये असल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. तसेच वाढत्या वयाच्या खुणा पुसट करण्यासाठी देखील मशरूम्स खाली पाहिजेत असे आहारतज्ञांचे म्हणणे आहे. मशरूम्स मध्ये अर्गोथीयोनीन आणि ग्लुटाथिओन नामक अँटी ऑक्सिडंट आहेत. तसेच मशरूम्स च्या नियमित सेवनाने डीमेंशियाआणि अल्झायमर सारखे मेंदुशी निगडीत विकार होण्याची शक्यता कमी असते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पोर्चीनी नामक मशरूम्सच्या जातीमध्ये सर्वात अधिक मात्रेमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असल्याचे आहारतज्ञांचे मत आहे. ह्या जातीची मशरूम्स इटली देशामध्ये जास्त प्रचलित आहेत. भारतामध्ये उपलब्ध असणारे बटन मशरूम्स ही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. मशरूम्स च्या सेवनाने मेंदूशी आणि विचारशक्तीशी निगडीत विकार होण्यची संभावना कमी होते. तसेच कॅन्सर, हृदयरोग इत्यादी रोग ही मशरूम्सच्या नियमित सेवनाने दूर राहतात.

Web Title: The new superfood of modern day - mushrooms