सरकारी अतिथीगृहाचे विजय माल्ल्यासाठी होणार कारागृहात रूपांतर


मुंबई : राज्य सरकार विजय माल्ल्यासाठी सरकारी अतिथीगृहाचे कारागृहात रूपांतर करण्यासाठी तयार असून माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला लंडन कोर्टाकडून आर्थर रोड जेलच्या स्थितीवरून नकार मिळू नये म्हणून नवीन प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तयार केला आहे.

याआधी माल्ल्यासाठी आर्थर रोड जेलमधील बराक नं- १२ तयार ठेवण्यात आल्याचा प्रस्ताव होता, माल्ल्यासाठी हे बराक तयार ठेवण्यात आले आहे. युरोपच्या कारागृहांमध्ये एसी वगळता ज्या सोयी असतात, त्या सर्व सोयी या बराकमध्ये असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. प्रस्तावासोबत या बराकचे फोटोही जोडण्यात आले होते.

२६/११च्या हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला याच बराकमध्ये ठेवण्यात आले होते. ४डिसेंबरला लंडन कोर्टात सुनावणी होणार आहे आणि माल्ल्याला कारागृहाच्या परिस्थितीच्या मुद्द्याचा फायदा मिळू नये, यासाठी ही पावले सरकारने उचलली आहेत.