Skip links

चिमुकल्या तैमूरला बालदिनानिमित्त सैफकडून १.३० कोटींचे गिफ्ट!


वडील सैफ अली खान यांनी आपल्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तैमूरला त्याच्या पहिल्या बालदिनाचे असे गिफ्ट दिले आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सुमारे १.३० कोटी रुपये ज्याची किंमत आहे.

एसआरटीची एक लाल रंगाची कार खरेदी करताना नुकताच सैफ अली खान दिसला होता. त्याला याबाबत विचारले असता तो म्हणाला की, एक बेबी सीट या कारमध्ये आहे. यात तैमूरला बसवून फिरायला घेऊन जाण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर तैमूरला बालदिनाच्या निमित्ताने गिफ्ट देण्याचा विचार करत असल्याचेही सैफने सांगितले.

मी ही कार खरेदी केल्याने फारच आनंदी असून मी तैमूरसाठी ही कार ठेवणार आहे. तसेही बाळांसाठी अतिरिक्त सुरक्षेची गरज असते आणि यात बेबी सीटही आहे. कारचा रंग तैमूरला आवडेल, अशी अपेक्षाही त्याने वेळी व्यक्त केली. दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका तैमूर पुढील महिन्यात २० डिसेंबरला एक वर्षांचा होणार आहे. आतापासूनच त्याच्या वाढदिवसाची तयारी जोरदार सुरु आहे.

Web Title: Taimur gets gift worth whopping Rs 1.30 crore from Daddy Saif Ali Khan