युवराजला पडला प्रश्न; हा फलंदाज असा कसा आउट झाला?


टीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणून ओळख असलेला डावखुरा फलंदाज युवराज सिंह आजही सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो काहीनाकाही पोस्ट करतच असतो. पण या वेळी त्याने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल, तसेच हे कसे घडले ते पाहून आपण आश्चर्यचकित देखील व्हाल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की युवराज आपल्या इंस्टाग्रामवर कोणता व्हिडिओ शेअर केला ज्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा पंचांकडून चुकीच्या पद्धतीने फलंदाजाला बाद दिल्याचे पाहायला मिळते. युवराजने असा किस्सा अनेकदा मैदानावर अनुभवलाही असेल. दरम्यान बऱ्याच दिवसापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या युवराजने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण यांच्यानंतर पंचांनी दिलेला निर्णय थक्क करुन सोडणारा असाच आहे.

🤔🤔🤔

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on


यात असे दाखवण्यात आले आहे की गोलंदाजाने स्टंप्सपासून दूर टाकलेला चेंडू फलंदाजाने यष्टिरक्षकाच्या हाती सोडून दिला आहे. या चेंडूवर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यांनी कोणतेही अपील केल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र, पंच फलंदाजाला बाद ठरवून रिकामे होतात. विशेष म्हणजे पंचांनी बाद दिल्यानंतर फलंदाजही कोणताही वाद न घालता मैदान सोडताना दिसतो. या पोस्टला आतापर्यंत (बातमी देई पर्यंत) साडे सहा लाख लोकांनी लाईक केले आहे, तर तीन हजारहून जास्त त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत.